टोमॅटोचं सारं – झटपट व झणझणीत घरगुती रेसिपी | Tomato Saar Recipe in Marathi

 

🍅 आज बनवूया झटपट आणि स्वादिष्ट टोमॅटोचं सारं – अगदी घरच्या घासासाठी!
टोमॅटोचं झणझणीत सार – पारंपरिक मराठी पद्धतीने तयार केलेली लालसर पातळ रस्सा रेसिपी भातासाठी

आज मी तुम्हाला दाखवणार आहे एक अतिशय साधी आणि चविष्ट रेसिपी – टोमॅटोचं सारं!
कधी पोळी नसेल, भाकरी नसेल, तरीही भातासोबत पक्कं झणझणीत आणि दिलासा देणारं जेवण – म्हणजे हे टोमॅटोचं सारं !


पूर्ण रेसिपी व्हिडिओ 👇👇

https://youtu.be/nCKdLBligGQ?si=zmJY-yBbt4BG1Muz


📝 लागणारे साहित्य:

  • ३ मध्यम आकाराचे टोमॅटो
  • २-३ हिरव्या मिरच्या
  • १/२ इंच आलं
  • २-३ लसूण पाकळ्या (ऐच्छिक)
  • मीठ – चवीनुसार
  • २ टेबलस्पून सुकं खोबरं (किंवा ओलं खोबरं)

फोडणीसाठी:

  • १ टीस्पून जिरे
  • १/४ टीस्पून हळद
  • चिमूटभर हिंग
  • १ टीस्पून तेल / तूप
  • थोडीशी साखर (ऐच्छिक)
  • थोडी कोथिंबीर सजावटीसाठी

🍲 कृती:

  1. सर्व साहित्य कुकरमध्ये शिजवा: टोमॅटो, मिरच्या, आलं, लसूण (ऐच्छिक), आणि थोडंसं पाणी घालून कुकरमध्ये २ शिट्ट्या होईपर्यंत शिजवा.
  2. टोमॅटोच्या रेसिपी, मराठी रेसिपी, घरगुती जेवण, झणझणीत रेसिपी, Maharashtrian Recipes, Tomato Saar
  3. मिक्सरमध्ये पेस्ट करा: शिजलेलं मिश्रण थंड झाल्यावर त्यात खोबरं घालून एकसंध बारीक पेस्ट तयार करा.
  4. फोडणी द्या: कढईत तेल तापवून त्यात जिरे, हळद, आणि हिंग टाका. जिरे तडतडले की टोमॅटोची पेस्ट घाला.
  5. सार तयार करा: हवे असल्यास थोडंसं पाणी घालून पातळ करा. चवीनुसार मीठ, थोडी साखर आणि कोथिंबीर घालून उकळी आणा.

🍚 सर्व्ह करताना:




हे टोमॅटोचं झणझणीत सार गरमागरम भातासोबत द्या.
पोळी-भाकरी नसलं तरी चालेल, पण भात असलाच पाहिजे!

Previous Post Next Post

Contact Form