नवशिक्यांसाठी अगदी सोपी गुलाबजाम रेसिपी
पहिल्याच प्रयत्नात जमून येईल • स्टेप-बाय-स्टेप • व्हिडिओ-स्टाइल मार्गदर्शन
नमस्कार आज अगदी सोप्या पद्धतीत गुलाबजाम बनवुया जरी पहिल्यांदा बनवणार असाल तरी तुम्हाला सुद्धा जमतील. माझा सुद्धा पहिलाच प्रयत्न आहे त्यासाठी चे साहित्य
साहित्य
- १ भांड खावा
- १/४ भांडे मैदा
- १ चिमूट भर सोडा
पाका साठी चे साहित्य
- १ भांडे साखर
- १ / २ भांडे पाणी
- १ चमचा वेलची पावडर
- अर्धी चिमूट यायचा रंग केशरी रंग (ऐच्छिक )
आता करायला सुरुवात करूया कृती
सर्वप्रथम खवा दहा ते बारा मिनिटे चांगला व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असा मळून घेऊया
खवा जर घट्ट असेल तर किसनीने किसून घ्यायचा
आणि मग मळायचा
तो पण दहा ते पंधरा मिनिटे
हा खवा भरपूर माऊ झाला होता त्यामुळे मी तसाच म्हळायला घेतला आहे
खवा मळताना जोपर्यंत हाताला तूप लागत नाही म्हणजे खाव्यातून तूप थोडंसं सुटत नाही तोपर्यंत खवा मळून घ्यायचा
व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे म्हणावहलक्या हाताने जर खवा मळला तर गुलाबजामतेलात टाकल्यावर फुटतात त्यामुळे व्हिडिओत दाखवल्यानुसार माळावे.
खावा मळून झाला आहे पंधरा मिनिटे आता हाताला तूप सुटले सारखं लागतंय मग आता त्याच्यामध्ये मी मैदा घालत आहे मैदा थोडा थोडा घालायचा आणि मळायच परत थोडा थोडा घालायचा परत म ळुन घ्यायचा
आता मैदा घातलेला खवा हा सुद्धा तूप सुटेपर्यंत मळायचा.हे पहा असाच खवा म्हणून झालेला आहे.आता या मळलेल्या खव्याचा एक छोटा गोळा करून पाहायचा तो जरपूर्णपणे नितळ मळला गेला म्हणजे आपलं खवा बरोबर झालेला आहे त्या मळलेल्या छोट्या गोळ्याला कोणत्याही चरा/ तडा जाता कामा नये.
बघा किती छान असं नितळ मळल्या गेलेला आहे अशाच पद्धतीने आता हा आपला गोळा बरोबर झालेला आहे. हा जसा गोळा बनवला आहे तसेच बाकीचेही गोळे बनवून घेत आहे मी घेतलेल्या साहित्यामध्ये एकूण 35 गुलाबजाम झालेले आहेत.
तसं खव्याचा वजनी प्रमाण हे 250 ग्रॅम आहेआणि आधी सांगितलेले सर्व साहित्य हे मी एकाच भांड्याने मोजलेले आहे. म्हणून ठेवलेले गुलाबजाम चे गोळेहे झाकून ठेवून पाक करायला घेऊया
इथे एक भांडे खवा आहे तर एक भांडे साखर घातलेली आहे.त्यामध्ये दीड भांडे पाणी घालत आहे सर्व प्रमाण एकाच भांड्याने मोजलेले आहे. आता गॅसवर पाक करायला ठेवूया पाक करत असताना पाखासारखा हलवत राहावा म्हणजे साखरही छान विरघळते. पाक जास्त घट्ट किंवा जास्त पातळही नको त्याला तारही येता कामा नये.तो हा असा.साखर पूर्ण वितळल्यानंतर त्यामध्ये वेलची आणि थोडासा रंग मी इथे घातलेला आहे कारण माझ्याकडे केशर नव्हते. पाकात केशर घातल्याने पाकाला आणि गुलाबजामला एक मस्त सुगंध पण येतो आणि रंग पण चांगला येतो. पहा ते पाकाला छान उकळी सुद्धा आलेले आहे आणि तारही आलेली नाही म्हणजे हा आपला पाक तयारहोत आहे
तोच दुसऱ्या शेगडीवरगुलाबजाम तळून घेऊया
आता गुलाबजाम तळण्यासाठी पहिल्यांदा तेल तळण्यासाठी मोठ्या गॅस करून तेल कडकडीत तापवून घ्यायचं मग गॅस बारीक करायचा आणि त्या गुलाबजामचा गेलेला गोळा तो छोटासा सोडून पाहिला तो जर हळूहळू करत जर वर आला तर समजायचं आपलं तेल परफेक्ट तापलेला आहे पटकन जर वर आला तर त्या गुलाबजाम तळायचे नाही बघा इथे गुलाबजाम मी टाकलाय तो हळुवारपणे वर येत आहे म्हणजे हे तेल बरोबर आहे .
रेसिपी फुल व्हिडिओ 👇👇
https://youtu.be/j0yWQcF-gNo?si=t1C24gWzvnDul8Kn
आता एकेक करून गुलाबजाम तळून घेऊया. आता मी गुलाबजाम चे हे गोळे तेलात सोडले आहे आता तळण्यासाठी मी जसा चमचा फिरवती आहे
त्या पद्धतीतच गुलाबजाम तळायचा आहे. हळुवारपणे व काळजीपूर्वक समजा त्याला मध्ये गोल गोल फिरवायचा आहे म्हणजे गुलाबजाम आपले सर्व बाजूने एकसारखे तळले जातात गॅस बारीकच ठेवायचा आहे.बघा इथे आता गुलाबजाम छान असे गोल्डन ब्राऊन कलरचे तळून झालेले आहेत.
मी हे लगेचच शेजारी गरम असलेल्या पाकात लगेचच घालत आहे म्हणजे त्यामध्ये पाकही छान मुरतो. गरम गुलाबजाम हे गरम पाकातच घालायचे आहे. अशा पद्धतीने मी सर्व गुलाबजाम तळून घेत आहे. बघा इथे माझे सर्व गुलाबजाम तळलेले आहेत व ते पाकात सुद्धा सोडलेले आहेत. त्यामुळे ते लवकर पाका मध्ये मुरतील. पाक गार झाल्यावर तासाभराने गुलाबजाम खाण्यासाठी रेडी.हे बघा हे असे किती छान अगदी
रसरशीत गुलाबजाम पाकात व्यवस्थित मुरला आहे बारीक गॅसवर गुलाबजाम तळल्यामुळे गुलाबजाम आज पर्यंत तळले गेलेले आहेत त्यामुळे पहिल्याच प्रयत्नात आपले गुलाबजाम छान झालेले आणि जमलेले ही आहेत तुम्ही सुद्धा ही रेसिपी अशाच पद्धतीने करून पहा आणि मी पहिल्यांदा केलेल्या गुलाबजाम व्यवस्थित जमले आहे का हे कमेंट मध्ये सांगा व तुम्हाला सुद्धा हे जमले का तेही सांगा ब्लॉग आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब ब्लॉग ला फॉलो करा..