मार्केटसारखा जाळीदार ढोकळा | सोपी आणि मऊसुद रेसिपी | Gujarati Dhokla Recipe in Marathi

 

मार्केटसारखा जाळीदार ढोकळा | सोपी पद्धत

आज सुट्टी होती मग विचार केला की मार्केट सारखा जाळीदार ढोकळा बनवुया सोप्या पद्धतीत चला सुरू करुया माझ्या आईने सांगितलेल्या प्रमाणानुसार

 ( प्रत्यक्ष युट्युब वर रेसिपी पहा). link 👇👇

https://youtu.be/KwpEyu2yLWg?si=uQcffDXBtyIaUvqA

ढोकळा रेसिपी, Gujarati Recipes in Marathi, नाश्त्याच्या रेसिपी, Market Style Dhokla, Easy Snacks Marathi

🍲 बॅटर साठी चे साहित्य
  • १½ वाटी बेसन (तुम्ही मेजरमेंट कप सुद्धा मोजू शकता)
  • १ वाटी पाणी (बॅटरसाठी)
  • १ चमचा लिंबू सत्व / १ चमचा लिंबू रस घेऊ शकता
  • ½ छोटा चमचा हळद
  • २ चमचा तेल (बॅटरसाठी)
  • चवीनुसार मीठ
  • ३-४ चमचे साखर (बॅटरसाठी)
  • ½ वाटी साखरेचे पाणी (ढोकळ्यासाठी)
  • १ चमचा सोडा

🌿 फोडणीचे साहित्य

  • तेल
  • ¼ चमचा जिरं
  • ¼ चमचा मोहरी
  • ३-४ मिरच्या
  • कोथिंबीर
  • कडिपत्ता


👩‍🍳 बनवूया ढोकळा

सर्व प्रथम बेसन आणि हळद चाळूया त्यामुळे पीठ हलके होते. आता १ वाटी पाणी त्यामध्ये साखर, मीठ, लिंबू सत्व घेऊन मिक्स करून घ्यावे. साखर विरघळून घेऊ. साखरे ऐवजी पीठी साखर वापरु शकता.

बघा सर्व साहित्य मिक्स झाले, पुर्ण साखर आणि लिंबू सत्व मिक्स झाले पाहिजे. यामध्ये चाळलेले पीठ घालून छानपैकी एकाच दिशेने ७-८ मिनिटे फेटून घ्यावे. बघा पीठ हळुहळु हलके होताना दिसत आहे. एकाच दिशेने फेटल्याने पीठ चांगले फुलते.

७-८ मिनिटे फेटुन झालेले आहे. १५ मिनिटे हे मिश्रण सेट करायला बाजूला ठेवून घेऊ. ५-७ मिनिटांनी इडलीचे भांडे पाणी घालून प्री हिट करून घेऊ.

बघा पीठाला १५ मिनिटे झाली आहे, आता पीठा मध्ये १ चमचा सोडा घालून पुन्हा फेटून घेऊ. बघा सोडा मिक्स होताना पीठ फुगत आहे. १-२ मिनिट फेटून लगेच भांड्यात घ्यावे. मी पोळीचा डब्बा घेतला आहे.

सर्व पीठ घातल्यावर डब्बा थोडा टॅप करून घ्यावा म्हणजे पीठ हवा जाते आणि सेट होते. बघा पाणी सुद्धा तापले आहे. स्टॅड वर डब्बा ठेऊन १५-१८ मिनिटे झाकण ठेऊन वाफवून घ्यावे.

तोपर्यंत ½ वाटी साखरेचं पाणी करू ढोकळ्यावर टाकण्यासाठी. मला १८ मिनिटे लागली. चाकू किंवा टूथपिक ने चेक करू — जर टूथपिकला काही चिकटले नाही तर आपला ढोकळा झाला आहे. बघा, क्लिन टूथपिक आहे म्हणजे ढोकळा झाला आहे.

मग गॅस बंद करून ५ मिनिटे झाकण ठेवून वाफ काढावी. नंतर ढोकळा थोडा कोमट करावा.

🌶 फोडणी तयार करणे

तेल कडकडीत गरम करून त्यामध्ये जिरं, मोहरी, मिरची तडतडून घ्यावी. नंतर कोथिंबीर घालावी (फोडणीत कोथिंबीर नाही घातली तरी चालते). हिंग टाकले आहे.

बघा ढोकळा पण कोमट झाला आहे. डब्ब्यातच कट करून मग त्यावर साखरेचे पाणी टाकू. सोबत लगेच फोडणी टाकली तरी चालेल. मी दोन्ही एकत्र टाकले आहे.


आता फोडणीची आणि साखरेची चव मुरण्यासाठी ४-५ मिनिटे सेट करू. बघा ५ मिनिटे झाली आहेत. सर्व्ह करूया, त्यावर कोथींबीर पेरू.

ढोकळा रेसिपी, Gujarati Recipes in Marathi, नाश्त्याच्या रेसिपी, Market Style Dhokla, Easy Snacks Marathi
मार्केटसारखा मऊसुद जाळीदार ढोकळा तयार आहे! तुम्हाला ढोकळा आवडल्यास नक्की शेअर करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा. धन्यवाद 🙏
Previous Post Next Post

Contact Form