शिल्लक राहिलेल्या भातापासून झटपट फोडणीचा भात
शिल्लक राहिलेल्या भातापासून चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया.
हा भात मोकळा करून घेतला सकाळी लवकर मला नाश्ता करायचा होता त्याच्यामुळे काही सुचलं नाही. शेवटी विचार केला की राहिलेल्या भातापासून फोडणीचा भात करूया.
इथे मी फोडणीच्या भातासाठीचे घेतलेले साहित्य म्हणजे हा मोकळा करून घेतलेला राहिलेला भात. त्यानंतर एक छोटा बटाटा, टोमॅटो, कांदा चिरून घेतलेला आहे.
फोडणीसाठी तिखट मिठाच्या डब्यातील साहित्य:
- मोहरी
- जिरे
- हळद
- लाल तिखट
- कांदा लसूण मसाला
- कढीपत्त्याची पावडर
कृती:
कढई तापलेली आहे, त्याच्यामध्ये तेल घालूया. मग आता मोहरी व जिरे घालून घेऊ. छान तडतडले आहे. आता कांदा टाकला आणि थोडासा परतला. त्याच्यानंतर आता बटाटा आणि त्याच्यानंतर टोमॅटो टाकून छान परतून घेऊ.
आता थोडी वाफ देऊया आणि मग बटाटा शिजला आहे का ते पाहूया. चला, बटाटा शिजलेला आहे.
त्यानंतर थोडीशी हळद, कढीपत्त्याची पावडर, लाल तिखट थोडं चवीपुरतं टाकूया. परत थोडसं परतुया.
आता त्यात भात घालू या आणि मग भात सगळा मिक्स करून परतून घेऊया. आता चवीनुसार मीठ घालावे. पुन्हा एकदा छान परतले. बघूया आता तिखट मीठ बरोबर लागले का? हो लागलंय.
चवीपुरती जराशी साखर टाकून परतून घ्यावे. आता इथे तयार झालेला आहे आपला झटपट फोडणीचा भात.
आता ताटलीत काढून खायला घेऊया. ताटलीत भात घेतला. त्याच्या कडेला बाजूंनी टोमॅटोचे काप लावूया आणि त्यावर वरून खोबरे टाकूया.
पूर्ण रेसिपी व्हिडिओ👇👇
https://youtu.be/fLzAQAjklFY?si=6eQ3YKfNaroRNBTI
चला! आता मस्त आपला फोडणीचा भात तयार झालेला आहे. सकाळच्या वेळेला घाई-गडबड असताना फोडणीचा भाताचा नाश्ता एकदम उत्तम.
साहित्य:
- राहिलेला भात
- एक छोटा कांदा
- एक छोटा बटाटा
- एक छोटा टोमॅटो (हे सर्व बारीक चिरून)
फोडणीचे साहित्य:
- मोहरी
- जिरं
- हळद
- लाल तिखट
- कांदा लसूण मसाला
- मीठ
- कढीपत्ता
- बारीक सुकं खोबरं
- थोडी साखर