झटपट शेंगदाण्याची चटणी रेसिपी | लसूण, मिरची आणि खोबऱ्याची चविष्ट चटणी

झटपट शेंगदाण्याची चटणी

झटपट तयार होणारी शेंगदाण्याची चटणी

आज बनवली आहे अशा पद्धतीत झटपट तयार होणारी शेंगदाण्याची सर्वांना आवडेल अशी चटणी. कशी बनवली ती तुम्हाला सांगते.

साहित्य

अर्धा वाटी शेंगदाणे (भाजून घेतलेले), तेवढ्याच मापाचे लसूण, मिरची, खोबरं पावडर, चवीसाठी मीठ आणि लाल तिखट.

कृती

आता रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी इथे मी भाजलेले शेंगदाणे आहेत तर तेलामध्ये असे थोडेसे ब्राऊन कलर होईपर्यंत तळते.

Watch the video 👇👇

https://youtu.be/mEDc6VjLQ6o

आता इथे दाणे तळून झालेले आहेत. त्यानंतर मिरच्याही अशाच पद्धतीने तेलामध्ये सोडून झाकण ठेवून तळून घेते. येथे मिरच्याही तळलेल्या आहेत.

GuruCharitra Books ×
Book 1

GuruCharitra Part 1 Chapter 1 to 5

English Reading Edition

Buy
Book 2

GuruCharitra Part 2 Chapter 6 to 10

Spiritual Wisdom

Buy
Book 3

GuruCharitra Part 3 Chapter 11 to 15

Datta Teachings

Buy
Book 4

GuruCharitra Part 4 Chapter 16 to 20

Daily Devotional

Buy
Book 5

GuruCharitra Part 5 Chapter 21 to 25

Divine Reading

Buy
Book 6

GuruCharitra Part 6 Chapter 26 to 30

English Transliteration

Buy
Book 7

GuruCharitra Part 7 Chapter 31 to 35

Sacred Knowledge

Buy
Book 8

GuruCharitra Part 8 Chapter 36 to 40

Datta Blessings

Buy
Book 9

GuruCharitra Part 9 Chapter 41 to 45

Spiritual Journey

Buy
Book 10

GuruCharitra Part 10 Chapter 46 to 53

Complete Edition

Buy

आता ह्यानंतर लसूण तळायचे. तर इथे मी लसूण सालासकट तळत आहे. ते सुद्धा लसूण अशा तेलामध्ये सोडून त्याच्या झाकण ठेवून तळत आहे.

लसूण करताना एक खबरदारी घ्यायची की तेल कडकडीत तापवून तेल खाली उतरवून त्यामध्ये लसूण तळावे. गॅसवर तेल ठेवू नये कारण लसूण हे तळल्या गेल्यानंतर ते उडतात. त्यामुळे सांभाळूनच लसूण तळावे. नाहीतर लसूण सोलून तळून घ्यावे थोड्या तेलामध्ये.

इथे अशा पद्धतीत मी लसूण तळलेले आहे. मी लसूण सालासकट तळले त्याच्यामुळे काही लसूण तेलातून वर उडायला लागले त्यामुळे व्हिडिओ शूट करता आला नाही.

लसूण तळले त्यानंतर खोबरे हे भाजून घ्यायचे, थोडेसे ब्राऊन होईपर्यंत. इथे मी भाजत आहे.

अशा रीतीने मिरच्या, दाणे, लसूण हे सर्व छान पैकी तळलेले आहे आणि खोबरंही भाजलेला आहे.

आता या सर्व साहित्यांना मिक्सरमधून बारीक फिरवून घेऊया.

आधी इथे मी मिरच्या बारीक केल्या आणि प्लेटमध्ये काढल्या. त्यानंतर लसूण बारीक करते. त्याच लसूण बारीक करताना यामध्ये चवीनुसार मीठ आणि तीन ते चार मोठे चमचे लाल तिखट यामध्ये घालून फिरवून घेते.

आता लसूणही बारीक केलेला आहे.

आता शेंगदाणे आणि भाजलेले खोबरे सुद्धा बारीक करते.

आता सगळे साहित्य एकत्र करते.

आता यामध्ये मी एक मोठा चमचा पिठीसाखर ॲड करत आहे.

सगळे साहित्य एकत्र केलेले आहेत. अशा रीतीने इथे सगळ्यांना आवडेल अशी शेंगदाण्याची चटणी तयार झालेली आहे.

तुम्ही सुद्धा अशा पद्धतीत ही चटणी बनवून पहा आणि ही चटणी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा.

Previous Post Next Post

Contact Form