लाटून केलेली ज्वारीची भाकरी | मऊ, लुसलुशीत आणि सोपी भाकरी रेसिपी

लाटून केलेली ज्वारीची भाकरी

लाटून केलेली ज्वारीची भाकरी

ज्यांना थापून भाकरी बनवता येत नाही त्यांच्यासाठी आज सुंदर एक पद्धत – लाटून केलेली भाकरी.

आज आपण मी बनवणार आहे लाटून केलेली भाकरी. कशी केली ते पाहूया.

कृती

इथे स्टोव्ह दाखवला, स्टोव्ह पेटवला. त्याच्यावर एक कढई ठेवली. त्या कढईमध्ये दीड वाटी पाणी टाकलं. पाणी गरम करायला ठेवलं.

त्याच्या मध्ये चवीपुरतं थोडंसं मीठ आणि दोन चमचे तेल घातलं. आता मी चांगलं विरघळून घेतलं आणि पाण्याला चांगली उकळी आणून दिली.

इथे पाण्याला चांगली उकळी आलेली दिसत आहे. आता याच्या मध्ये आपण जेवढं पाणी घेतलं होतं तेवढंच वाटी ज्वारीचं पीठ घालत आहे.

watch on YouTube video 👇👇

https://youtu.be/h8SZ9llYDP0

आता याच्या मध्ये ज्वारीचे पीठ मी ॲड केलं आणि आता व्यवस्थित ते पीठ असं हलवून घेतलं. एकजीव करेपर्यंत ते हलवलं.

आता सगळं पाणी त्याला आटवून घेतलं. आटल्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवलं आणि स्टोव्ह बंद केला.

आता असंच दहा मिनिटं झाकून ठेवायचं.

दहा मिनिटं झाले. दहा मिनिटांनी हे चांगलं गरम असतानाच, कोमट असतानाच मळून घ्यायचं.

GuruCharitra Books ×
Book 1

GuruCharitra Part 1 Chapter 1 to 5

English Reading Edition

Buy
Book 2

GuruCharitra Part 2 Chapter 6 to 10

Spiritual Wisdom

Buy
Book 3

GuruCharitra Part 3 Chapter 11 to 15

Datta Teachings

Buy
Book 4

GuruCharitra Part 4 Chapter 16 to 20

Daily Devotional

Buy
Book 5

GuruCharitra Part 5 Chapter 21 to 25

Divine Reading

Buy
Book 6

GuruCharitra Part 6 Chapter 26 to 30

English Transliteration

Buy
Book 7

GuruCharitra Part 7 Chapter 31 to 35

Sacred Knowledge

Buy
Book 8

GuruCharitra Part 8 Chapter 36 to 40

Datta Blessings

Buy
Book 9

GuruCharitra Part 9 Chapter 41 to 45

Spiritual Journey

Buy
Book 10

GuruCharitra Part 10 Chapter 46 to 53

Complete Edition

Buy

आता हे थोडंसं कोमट आहे त्यामुळे आता ते मी मळून घेते. गार पाण्याचा थोडा हात लावायचा म्हणजे ते भाजत नाही.

आता हे मस्त चांगलं मळून घेतलं. त्याला थोडं तेल लावायचं. चांगलं मळलेलं गेलेलं आहे.

आता त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. गोळे केलेले झाकून ठेवायचे म्हणजे वाऱ्याने वाळणार नाहीत आणि आपल्याला व्यवस्थित लाटता येतात.

आता एक छोटा गोळा केला. तो ज्वारीच्या पिठात घोळवून घेतला. थोडंसं पीठ वर लावलं आणि आता हलक्या हाताने पोळी करतो त्या पद्धतीने हळूहळू लाटला.

किती सुंदर लाटला जात आहे. तवा पण तापवायला ठेवलेला आहे. भाकरी लाटून होईपर्यंत तवा पण चांगला तापेल.

तवा चांगला तापला की त्याच्यावर ही भाकरी टाकायची. आता तवा तापलेला आहे त्याच्यावर ही मी भाकरी भाजायला ठेवत आहे.

एक भाकरी भाजत असताना मी या ठिकाणी दुसरी भाकरी लाटत आहे.

थोड्यावेळाने तव्यावरील भाकरीची वरची बाजू कोरडी दिसायला लागली आहे. आता या भाकरीला आपण पलटू.

आता दुसरी बाजू पण अशीच भाजून घ्यायची.

सगळी भाकरी तव्यावर भाजली तरी चालते. पण जर जास्त वेळ नको वाटायला किंवा भाजायला जास्त वेळ लागतो असं वाटलं तर तवा उचलून खाली ठेवायचा आणि भाकरी चिमट्यात पकडून थेट स्टोव्हवर किंवा गॅसवर भाजायची. त्यामुळे भाकरी छान खरपूस भाजली जाते आणि खायला मऊ लुसलुशीत लागते.

आता भाकरी बनवून झालेली आहे. सगळ्या भाकऱ्या अशाच पद्धतीने बनवून घेत आहे.

हे बघा, दीड वाटीच्या पिठामध्ये मी सहा भाकऱ्या बनवलेल्या आहेत. बऱ्यापैकी छोट्या केलेल्या आहेत.

दुसरी भाकरी सुद्धा तव्यावर थोडी फुगलेली आहे.

अशाच पद्धतीने मी इथे काही भाकऱ्या बनवलेल्या आहेत. लुसलुशीत भाकरी एका हातामध्ये रुमालासारखी घडी होत आहे.

अशाप्रकारे मी लाटून एकदम मऊ आणि लुसलुशीत भाकऱ्या बनवलेल्या आहेत.

तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने भाकरी बनवा आणि ही भाकरी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा.

Previous Post Next Post

Contact Form