साबुदाणा थालीपीठ
साहित्य :
- 1. साबुदाणा – पाऊण कप
- 2. बटाटे – दोन मध्यम किंवा तीन लहान
- 3. मीठ – चवीनुसार
- 4. साखर – दीड ते दोन चमचे
संपूर्ण व्हिडिओ रेसिपी 👇👇
- 5. दाण्याचा कूट – अर्धा कप
- 6. चिरलेली कोथिंबीर
- 7. हिरव्या मिरच्या – सहा ते सात (बारीक चिरलेल्या किंवा ठेचलेल्या; प्रमाण आवडीनुसार कमी-जास्त करता येईल. कोणत्याही प्रकारच्या मिरच्या वापरल्या तरी त्या बारीक असाव्यात, मोठे तुकडे टाळावेत – यामुळे थालीपीठाची चव अधिक खुलते.)
- 8. ओले खोबरे – अर्धा कप
- 9. जिरे – १ ते दीड चमचा
- 10. लिंबाचा रस – अर्ध्या लिंबाचा
- 11. तूप – भाजण्यासाठी
कृती :
- 1. सर्वप्रथम, साबुदाणा किमान ४ ते ५ तास भिजवून ठेवा.
- 2. बटाटे उकडून घ्या. साले काढून, शक्य असल्यास ते किसून घ्या.
- 3. एका मोठ्या परातीत भिजवलेला साबुदाणा, किसलेले बटाटे, मीठ, साखर, दाणेकूट, कोथिंबीर, मिरच्यांचे बारीक तुकडे किंवा ठेचलेली मिरची, ओले खोबरे, जिरे आणि लिंबाचा रस – हे सर्व साहित्य एकत्र करा.
- 4. मिश्रण जरा सैल वाटल्यास थोडेसे पाणी शिंपडा. सर्व घटक चांगले मळून एकजीव करा.
- 5. एक पातेलं गरम करून त्यात थोडं तूप वितळवा – तूप घालण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी हे उपयोगी ठरते.
- 6. तुपाच्या पॅनमध्ये थालीपीठ थापा किंवा प्रथम स्वच्छ कापडावर थापून मग ते
- पॅनमध्ये उलटवा. थालीपीठ फार पातळ किंवा जाड होणार नाही याची काळजी घ्या.
- 7. थालीपीठाच्या मधोमध व बाजूंनी चार–पाच छोटे भोके पाडा.
- 8. या भोकांमध्ये व थोडे थोडे आजूबाजूला तूप सोडा.
- 9. गॅस मध्यम आचेवर ठेवा व झाकण ठेवून शिजवा.
- 10. ३–४ मिनिटांनी झाकण बाजूला सारून थालीपीठ उलटवा.
- 11. गरज भासल्यास पुन्हा थोडे तूप सोडा आणि पुन्हा झाकण ठेवा.
- 12. अजून ३–४ मिनिटांनी झाकण काढून थालीपीठ परातीत काढा.
- 13. थालीपीठ दोन्ही बाजूंनी सुंदर तांबूस व कुरकुरीत होईपर्यंत खरपूस भाजा.
- 14. वरील साहित्य वापरून, मध्यम आकाराच्या साधारण चार थालीपीठे तयार होतात.
- 15. हे साबुदाणा थालीपीठ सर्व्ह करताना, सोबत द्यायला खालीलपैकी काही पर्याय निवडू शकता –
- दही
- काकडी
- रसलिंबू
- ओले खोबरे + कोथिंबीर + मिरची यांची चविष्ट चटणी
- दही + दाण्याचा कूट चटणी
- काकडी + दही कोशिंबीर
- केळी + दही कोशिंबीर
टीप: उपवासासाठी आदर्श आणि चवदार पर्याय असलेल्या या थालीपीठाची चव घरातील प्रत्येकाला आवडेल!