घरच्या घरी मिनी पॅटीस
मी आज घरच्या घरी मिनी पॅटीस बनवले आहेत. चला तर मग कसे बनवले हे तुम्हाला दाखवते.
कणिक तयार करण्याची कृती
त्यासाठी आधी मी इथे २ वाटी मैदा चाळला. मैदा चाळला आता त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ आणि चार चमचे तेल ॲड केले.
आता हे तेल मैद्यामध्ये छान पैकी मिक्स करते. तेल इथे मिक्स झालेला आहे.
आता इथे मैद्याचा अशाप्रकारे उंडा तयार झालेला दिसतो.
watch on YouTube 👇👇 https://youtu.be/hNERMoj9XHMआता यामध्ये गरजेनुसार पाणी घालून मी याची कणिक मळते.
बघा इथे कणिक मळलेली आहे. जास्त घट्टही नाही आणि जास्त मऊही नाही.
आता याला झाकण ठेवून पाऊण तास बाजूला ठेवते.
सारण तयार करण्याची कृती
तोपर्यंत पॅटीससाठी सारण बनवते.
त्यासाठी बटाटे आधी उकडून घेतले.
कढई ठेवली. त्यामध्ये तेल टाकले. जिरं आणि मोहरी छान पैकी तडतडून दिली.
त्यामध्ये मी इथे बारीक चिरून घेतलेला कांदा परतते.
कांदा परतला त्यानंतर हळद, दोन चमचे कांदा लसूण मसाला घालून पुन्हा हे परतते.
आता यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करून थोडंसं पाणी शिंपडून परतत आहे.
आता यानंतर उकडलेले बटाटे यामध्ये ॲड करून सगळा मसाला बटाट्याला छान पैकी लावते.
इथे बटाट्याची भाजी तयार झालेली आहे पॅटीसच्या सारणासाठी.
साटा तयार करण्याची कृती
त्यानंतर पॅटीसच्या पट्ट्या करण्यासाठी साटा लागतो.
त्यासाठी येथे मी साजूक तुपाच्या ऐवजी इथे मी बटर वापरलेले आहे.
मी मोठे दोन चमचे बटर वितळून घेतलेला आहे.
आता त्यामध्येच दोन चमचे कॉर्नफ्लॉवर ॲड केले.
आता याला फास्ट स्पीडमध्ये फेटत आहे जोपर्यंत याचा रंग पांढरा असा होत नाही.
हे बघा इथे याचा रंग पांढरा झालेला आहे.
पॅटीसचे लेअर तयार करणे
कणिक मळून पाऊण तास झालेला आहे.
पुन्हा याला थोडंसं मळून घेते.
कणकेचे मी चार गोळे बनवते.
आता एकेक करून या चारही गोळ्यांची अशाप्रकारे पातळ आणि अगदी हलक्या हाताने पोळी लाटत आहे.
चार पोळ्या लाटल्या.
एक एक करून अशा प्रकारे प्रत्येक पोळीला जो आपण कॉर्नफ्लॉवर आणि बटरचा साटा बनवला होता तो पूर्ण काठापर्यंत अति पातळ असा लेयर लावत आहे.
हे बघा अशाप्रकारे आता इथे एक लेयर लावला.
यावर दुसरी पोळी ठेवायची आणि अशाच पद्धतीत तीन वेळा हे रिपीट करणार.
वरच्या चौथ्या पोळीला इथे साटा लावलेला नाही.
आता थोडेसे लाटून थोडा आकार मोठा करून आता याला थोडासाच साटा पूर्ण काठापर्यंत पसरून वरती थोडा मैदा भुरभुरायचा.
ज्यावेळी साटा लावलेला आहे तिथे मी मैदा थोडासा भुरभुरलेला आहे.
याची इथे मी घडी घालत आहे.
अशा प्रकारे एक घडी घातली की तिथे तो साटा लावायचा.
हे बघा इथे आता चौकोनी शीट तयार झालेली आहे.
आता याला अशा चौकोनी पद्धतीने लाटून घ्यायचं.
अगदी हलक्या हाताने लाटायचं.
याचा मी आता इथे चौकोनी आकार बिघडू दिला नाही.
याच्या कडा कापते आणि याला एक चौकोनी आकार दिला आहे.
आता याच्या एकूण मी नऊ तुकडे केलेले आहेत.
त्या ऐवजी तुम्ही सहा तुकडे सुद्धा करू शकता.
पॅटीस भरणे व तळणे
इथे नऊ तुकडे तयार झाले.
आता यामध्ये मी सारण भरते.
त्यासाठी जेवढा पॅटीसचा चौकोन तयार झालेला आहे तेवढ्या बरोबर मध्ये येथे मी बटाट्याची बनवलेली जी भाजी आहे ती ठेवत आहे.
याला चिकटवण्यासाठी सारणाच्या बाजूने थोडेसे पाणी लावायचं.
कडांना पाणी लावायचे नाही आणि कडा सुद्धा चिकटवायच्या नाहीत.
हे बघा अशा पद्धतीने पाणी लावलेले आहे.
आता याला हलक्या हाताने चिकटवत आहे.
कडा सुद्धा इथे मी मोकळ्या ठेवलेल्या आहेत.
अशा प्रकारे सगळे पॅटीस मी बनवते.
सगळे पॅटीस बनवले.
एकीकडे तेलही तापवायला ठेवलेले आहे.
तेलामध्ये थोडासा कणकेचा गोळा सोडायचा.
तो हळुवारपणे वर आला म्हणजे आपले तेल पॅटीससाठी बरोबर तापलेले आहे.
आता यामध्ये एका कढईत बसतील तेवढे मी पॅटीस सोडत आहे.
एकीकडे पॅटीसच्या वरच्या बाजूला असं तेल उडवलं.
बघा इथे हळूहळू त्याचे लेअर सुटायला येत आहे.
पूर्ण पेशन्सने तळल्यानंतर पॅटीस गोल्डन ब्राऊन झालेले आहेत आणि त्याचे लेअर सुद्धा सुटलेले दिसत आहे.
अशाच प्रकारे सगळे पॅटीस आता इथे मी तळते.
नंतरचे पॅकेज करताना ज्या कडा कापल्या होत्या त्यांना सुद्धा घडी घालून मी इथे खारी बनवलेली आहे.
अशा रीतीने खूप पेशन्सने तळल्यानंतर मी नऊ पॅटीस आणि थोड्याशा खाऱ्या बनवलेल्या आहेत.
हे बघा अगदी खुसखुशीत पॅटीस तयार झालेले आहे.
तोडताना सुद्धा याचा क्रंची आवाज येत आहे.
हे केलेले मिनी पॅटिस तुम्हाला कसे वाटले ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि तुम्ही सुद्धा अशा प्रकारे पॅटीस बनवून पहा.
