🔥 व्हेज चिली गार्लिक ग्रिल सँडविच रेसिपी (चीजचे दोरे!) - Pangat Gourmet Fusion

व्हेज चिली गार्लिक ग्रिल सँडविच - Pangat Gourmet Fusion

व्हेज चिली गार्लिक ग्रिल सँडविच

नमस्कार! स्वागत आहे तुमचं '... Pangat Gourmet Fusion...' मध्ये. आज आपण बनवणार आहोत एकदम चटपटीत आणि चवीला भन्नाट व्हेज चिली गार्लिक ग्रिल सँडविच. हे सँडविच खायला खूपच क्रिस्पी आणि स्वादिष्ट लागतं. चला तर मग, वेळ न घालवता साहित्य बघू!

🍔 सँडविचसाठी आवश्यक साहित्य

©️®️ Pangat Gourmet Fusion

  • १. टोस्टर
  • २. आलं, मिरची आणि लसूण याची पेस्ट (जी नंतर करून घेणार आहात)
  • ३. बटर (आवश्यकतेनुसार)
  • ४. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ब्रेड (गव्हाचा ब्रेड)
  • ५. मोझरेला चीज
  • ६. आणि कोथिंबीर

🔪 व्हेज चिली गार्लिक ग्रिल सँडविच कृती

©️®️ Pangat Gourmet Fusion

सगळ्यात आधी इथं मी बटर थोडसं पातळ करून घेतलं व सगळ्या ब्रेडला लावून घेते. आता नंतर आलं लसूण मिरचीची पेस्ट बनवली होती म्हणजे ग्रीन चटणी ती लावून त्याच्यावर थोडी कोथिंबीर भुरभुरते. तुम्हाला हवा असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही भाजी सुद्धा घालू शकता.

आता कोथिंबीर भुरभुरली त्यानंतर आपल्या सँडविच मधला महत्त्वाचा भाग म्हणजे मॉझरेला चीज भुरभुरते. हे चीज टाकताना अजिबात कंजूसी करायची नाही. अशाच पद्धतीने सगळे ब्रेड आधी मी सेट करून घेते.

थोडसं त्यावर परत बटर टाकलं आणि नंतर त्याच्यावरती वरचा लेयर ब्रेडचा लावलेला आहे. थोडं प्रेस करून आता टोस्टरला दोन्ही बाजूला बटर लावून ते पसरवून तयार केलेल्या सँडविच एक करून सर्व दोन्हीकडून भाजून घेऊ.

पूर्ण रेसिपी व्हिडिओ👇👇😋

🔥 सँडविच ग्रील करण्याची पद्धत

©️®️ Pangat Gourmet Fusion

बघा आता टोस्टर गॅसवर ठेवून याला दोन्ही बाजूंनी एखाद दोन मिनिटे मिडीयम गॅसवर भाजून घेऊ. तयार झाले इथे आपलं सँडविच.

अशाच पद्धतीने मी अजून एक दाखवते. या पहिल्या सँडविचला चीजचे दोरे आपल्याला हवे असतात म्हणजे चीज मेल्ट झालेलं हवं असतं ते तर इथे झाले नाही. दुसरा करून बघू. अशाच पद्धतीने मी सर्व स्लाईस दोन्हीकडून भाजून घेते.

छान बघा सगळे सँडविच आता भाजून झालेले आहेत. आता आपण कट करूया. एकदम छान पद्धतीत आतील चीज सुद्धा मेल्ट झालेलं आहे व त्याचे दोरे पण दिसत आहेत.

🎉 तयार आहे तुमचं सँडविच

©️®️ Pangat Gourmet Fusion

तयार आहे इथे आपलं व्हेज चीज ग्रील सँडविच! तुम्ही हे हिरव्या चटणी सोबत किंवा टोमॅटो केचप सोबत खाऊ शकता. तुम्ही सुद्धा ही रेसिपी करून पहा व ही रेसिपी आवडल्यास लाईक व पेज फॉलो करा आणि व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब करा!

Previous Post Next Post

Contact Form