दिवाळी स्पेशल चिवडा रेसिपी | कुरकुरीत भाजके पोहे आणि मुरमुरे चिवडा | Diwali Special Poha Murmura Chivda – Pangat Gourmet Fusion

Pangat Gourmet Fusion
दिवाळी स्पेशल: भाजके पोहे आणि मुरमुर्यांचा कुरकुरीत चिवडा (15–20 मिनिटात)
कमी तेलकट • शेवटपर्यंत कुरकुरीत • सोपी पध्दत

नमस्कार! स्वागत आहे तुमचं '... ©️®️Pangat Gourmet Fusion...'

 मध्ये. दिवाळी म्हटलं की फराळ आलाच! आज आपण दिवाळीसाठी अगदी १५ ते २० मिनिटांत तयार होणारा, कमी तेलकट आणि शेवटपर्यंत कुरकुरीत राहणारा भाजके पोहे आणि मुरमुऱ्याचा एकत्र सोपा चिवडा बनवणार आहोत. हा चिवडा बनवायला इतका सोपा आहे की स्वयंपाकघरातले नवशिक्या देखील सहज बनवतील. चला, तर मग पाहुयात आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे.


दिवाळी रेसिपी, चिवडा रेसिपी, भाजके पोहे, मुरमुरे चिवडा, फराळ रेसिपी, Maharashtrian snacks, Diwali special, Kurkure chivda, Pangat Gourmet Fusion

त्यासाठीच्या साहित्य

  1. अर्धा किलो भाजके पोहे
  2. अर्धा किलो मुरमुरे
  3. कढीपत्ता
  4. शेंगदाणे
  5. डाळवं
  6. हळद
  7. जीरमोहरी
  8. मिरच्या
  9. लसणाच्या पाकळ्या
  10. खोबरं
  11. चवीनुसार मीठ
  12. चिवडा मसाला 100 ग्रॅम
  13. आमचूर पावडर अर्धी वाटी
  14. चवीनुसार साखर (ऐच्छिक)
  15. तरीच लाल तिखट

कृती — चरणबद्ध

©️®️Pangat Gourmet Fusion

सर्वप्रथम तळणीचे पदार्थ बनवून घेऊया

त्यासाठी मी आधी कडे मध्ये तेल गरम करायला ठेवले तेल कडकडीत तेल तापल्यानंतर गॅस मिडीयम करून त्यामध्ये आधी दाणे तळून घेते दाणे एकदम काळे नाही पण थोडेसे ब्राऊन तळून घेऊया. बघा दाणे तळून झालेले आहे व याला एका कढईत काढते त्यानंतर खोबऱ्याचे केलेले काप हे सुद्धा तळून घेऊया ते सुद्धा जास्त काळे न करता थोडेसे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घेते बघा हे सुद्धा तळून झालेले आहे आता त्यानंतर अशाच पद्धतीने डाळ सुद्धा तळून घेते. झाली डाळ

©️®️Pangat Gourmet Fusion

तळून आता लसूण सुद्धा छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळते बघा हे सुद्धा तळून झालेले आहेत. आता कढीपत्ता तळून घेते बघा अशाच पद्धतीत कडीपत्ता सुद्धा तळून झालेला आहे त्यानंतर मिरच्या तळते आणि ह्या सुद्धा आता तळून झालेल्या आहेत.

हुश्श सगळे तळणीचे पदार्थ तळून झालेले आहेत आता भाजके पोहे आणि मुरमुरे हे मी आधीच थोडेसे भाजून घेतले आता आता या पोह्या आणि ©️®️Pangat Gourmet Fusion मुरमुऱ्यांवरती आत्ता तळलेले सगळे जिन्नस टाकून ते छान एकत्र करून घेते बघा ते हे असे तोपर्यंत तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल त्या कमेंट फॉलो आणि शेअर करा

दिवाळी रेसिपी, चिवडा रेसिपी, भाजके पोहे, मुरमुरे चिवडा, फराळ रेसिपी, Maharashtrian snacks, Diwali special, Kurkure chivda, Pangat Gourmet Fusion

हे एकत्र झालं आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले त्यामध्ये जिरं आणि मोहरी घालून छान पैकी तडतडून घेतलं आता त्यामध्ये दोन चमचे घेतलेली हळद घातली. या वेळेला इथे गॅस बंद आहे म्हणजे आपले मसाले हे करपणार नाही. त्यानंतर चिवडा मसाला व त्याच्या नंतर लाल तिखट घालून मिक्स करून घेते. आता मिक्स केल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ आणि आमचूर पावडर मिक्स करून फोडणी गार करायला ठेवली. फोडणी गार झालेले आहे. आता ही फोडणी मुरमुरे व पोह्यांवरती टाकून छानपणे सगळीकडे लागेल असे मिक्स करून घेऊया ते मी इथे घेत आहे. आता त्यानंतर मी इथे चवीनुसार पिठीसाखर घातलेले आहे थोडासा गोडसरपणा येण्यासाठी.

©️®️Pangat Gourmet Fusion

तयार आहे इथे मुरमुरा व दगडी पोहे यांचा मिक्स चिवडा यावर थोडीशी शेव आणि कोथिंबीर घालून सुद्धा तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता तुम्ही सुद्धा हे रेसिपी करून पहा व ही रेसिपी कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा.

तयार: 15–20 मिनिटे
©️®️Pangat Gourmet Fusion
Previous Post Next Post

Contact Form