झटपट होणारी पौष्टिक मुळ्याची भाजी | मूगळ्याची पाल्याची भाजी
★ मुळ्याची भाजीसाठी लागणारे साहित्य ★
- ३ किसून घेतलेले मुळे
- मुळ्याचे पान (बारीक चिरून घेतलेले)
- १ छोटा कांदा (बारीक चिरलेला)
- ७ ते ८ लसणाच्या पाकळ्या (ठेचून घ्या)
- १ चमचा लाल तिखट
- १ चमचा कांदा लसूण मसाला
- अर्धा चमचा पिठीसाखर
- चवीनुसार मीठ
- अर्धा चमचा हळद आणि हिंग
- तेल आणि दाण्याचा कूट
★ मुळ्याची भाजी बनवण्याची सोपी कृती ★
सुरुवातीला कढईमध्ये तेल गरम करून घेतलं. त्यामध्ये ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या, मोहरी आणि जिरं टाकून छान तडतडून घ्या.
त्यात चिरलेला कांदा आणि कढीपत्ता घालून कांदा हलका गुलाबी होईपर्यंत परतून घ्या.
कांदा परतल्यावर, अर्धा चमचा **हळद** घाला. नंतर त्यामध्ये **मुळ्याची पाने** आणि **किसून घेतलेला मुळा** घालून व्यवस्थित मिक्स करा.(झटपट होणारी मुळ्याची भाजी)
आता त्यात **लाल तिखट**, **कांदा लसूण मसाला**, **पिठीसाखर**, **चवीनुसार मीठ** व **हिंग** सर्व साहित्य घालून पुन्हा एकदा मिक्स करा.
भाजीवर **झाकण ठेवून** मुळा पूर्णपणे शिजेपर्यंत शिजवून घ्या. मुळ्याला छान पाणी सुटलेले दिसेल.
मुळा शिजल्यानंतर, गॅस मोठा करून पाणी थोडे आटवा. शेवटी, भाजीवर थोडासा **दाण्याचा कूट** घालून मिक्स करा. तयार आहे इथे **सोप्या पद्धतीत मुळ्याची भाजी**!
तुम्ही सुद्धा ही रेसिपी करून पहा. रेसिपी आवडल्यास...
चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा फेसबुक पेज ला कॉल करा


