आज सकाळी बनवले उडीद वडे आता हे तर खाऊन झाले त्याच्यानंतर आता
©️®️ Pangat's Fusion
रात्री जेवायला काय करायचंय मग ठरवले बिर्याणी बनवूया म्हणून मग साध्या तांदळापासून उडीद वडे घालून बनवली बिर्याणी.
त्यासाठी मी दोन वाट्या तांदूळ स्वच्छ धुऊन पाण्यामध्ये दहा मिनिटे भिजवून ठेवले. बाहेरचे जोडण्यासाठी मोठ्या पातेल्यामध्ये तमाल पत्र दालचिनी लवंग काळी मिरी #recipe #biryanitime
व्हिडिओ रेसिपी👇👇
https://youtu.be/OMOsBIU2Ck0?si=qIU70woSsC43TJzG
©️®️ Pangat's Fusion हे सर्व घालून पाणी छान उकळून घेते त्यानंतर भिजवून ठेवलेला तांदूळ त्यातील पाणी काढून तांदूळ या उकळत्या पाण्यामध्ये घालून शिजवायला ठेवते तांदूळ शिजेपर्यंत मसाला बनवते. तो बनवण्यासाठी मी दही घेतले त्यामध्ये बिर्याणी मसाला एक चमचा कांदा लसूण मसाला लाल तिखट हळद आणि थोडा खडा मसाला मिस करून पेस्ट बनवली त्यानंतर आले लसणाची पेस्ट एक उभा चिरून घेतलेला कांदा तीन ते चार मिरच्या ©️®️ Pangat's Fusion एक बटाटा चिरून घेतलेला आणि दोन टोमॅटो चिरून घेतलेले.
हे सर्व साहित्य घेईपर्यंत भात शिजलेला आहे आता याला मी एका चाळणीमध्ये काढून पाणी सर्व घेते.
आता कढईमध्ये तेल घालून त्यामध्ये जिरं घालून ते तडतडवून कांदा घातला व छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतते तोपर्यंत तुम्ही जर हा व्हिडिओ #postviralシ पहिल्यांदा पाहत असाल तर या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा.पेज फॉलो करा...#फॉलो
बघा कांदा किती छान परतून झालेला आहे आता यामध्ये मिरच्या आलं लसणाचे पेस्ट ©️®️ Pangat's Fusion टोमॅटो घालून परतून घेते टोमॅटो लवकर शिजण्यासाठी त्यामध्ये चवीनुसार मीठ घालते व झाकण ठेवून शिजवून घेते.
टोमॅटो सुद्धा शिजलेल्या आहेत आता यामध्ये मी आधी केलेली दह्याची पेस्ट घालते व तिला सुद्धा छान परतून बघा तेल सुद्धा छान परतले आहे आता यामध्ये बटाटे घालून त्यात थोडं पाणी घालून बटाट्यांना शिजवून घेते. बटाटा शिजलेला आहे वरती भात यामध्ये पसरवून घेऊया आणि मी सकाळी राहिलेले जेवढे उडीद वडे होते ते #rice #pulav
©️®️ Pangat's Fusion याच्यात वरती सर्विंग साठी ठेवत आहे म्हणजे कसं जरा दिसायला सुद्धा वेगळं आणि छान दिसत. आता झाकण ठेवून याला एक पाच मिनिटे वाफ काढून म्हणजे मसाल्याचा वास हे भाताला छान लागेल.
©️®️ Pangat's Fusion
अशा पद्धतीने तयार आहे आपली साधा तांदळापासून बनवलेली उडीद वडे आलू व्हेज बिर्याणी तुम्ही सुद्धा ही बनवून पहा व कशी झाली आहे ते कमेंट मध्ये नक्की सांगा. #post2025シ #रेसिपी #रेसीपी
- 2 वाट्या तांदूळ (स्वच्छ धुतलेले व 10 मिनिटे भिजवलेले)
- उकडण्यासाठी: तमाल पत्र, दालचिनी, लवंग, काळी मिरी
- दही (दहीची पेस्ट तयार करण्यासाठी)
- बिर्याणी मसाला, कांदा-लसूण मसाला, लाल तिखट, हळद, खडा मसाला
- आले-लसूण पेस्ट, एक चिरलेला कांदा, 3-4 मिरच्या
- 1 बटाटा (चिरलेला), 2 टोमॅटो (चिरलेले)
- तेल, जिरे, मीठ
- सकाळीचे उडीद वडे (रिसाईविंग/टॉपिंगसाठी)
- तांदूळ धुवून 10 मिनिटांसाठी भिजवून ठेवा.
- पातेल्यात तमाल पत्र, दालचिनी, लवंग, काळी मिरी आणि पाणी उकळवा. भिजवलेला तांदूळ पाण्यात घालून शिजवा.
- दहीमध्ये बिर्याणी मसाला, कांदा-लसूण मसाला, लाल तिखट, हळद व खडा मसाला मिस करून पेस्ट तयार करा.
- कढईत तेल, जिरे घालून कांदा परतून गोल्डन ब्राऊन करा. नंतर आले-लसूण पेस्ट, मिरच्या आणि टोमॅटो घालून परता. मीठ घाला व झाकून शिजवा.
- दहीची पेस्ट घालून परता, नंतर बटाटे घालून थोडे पाणी द्या व बटाटे शिजवा.
- शिजलेल्या भातावर ही मसाला-तरकारी पसरवा. वरच्या भागाला उडीद वडे सर्विंगसाठी ठेवा.
- झाकण ठेवून 5 मिनिटे वाफ काढा व गरम गरम सर्व्ह करा.



