सोपी आणि झटपट बटाट्याची रस्सा भाजी | वाटण न करता बनवा ही खास रेसिपी | Batata Bhaji Recipe

 

सोप्या पद्धतीत वाटण न करता बटाट्याची रस्सा भाजी

★ त्यासाठीचे साहित्य ★

  • दोन उकडून घेतलेले बटाटे
  • एक बारीक चिरून घेतलेला कांदा
  • कढीपत्त्याची पाने (आठ ते दहा)
  • दोन ते तीन बारीक चिरून घेतलेल्या मिरच्या
  • लसणाच्या पाकळ्या
  • एक इंच किसलेलं आलं
  • कोथिंबीर
  • एक बारीक चिरून घेतलेला टोमॅटो
  • एक ते दोन चमचे खोबरं पावडर
  • हळद, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, हिंग
  • चवीनुसार मीठ, चवीनुसार साखर, थोडासा खडा मसाला (झटपट बटाट्याची भाजी...)

  • बटाट्याची भाजी, मराठी रेसिपी, रस्सा भाजी, उपवासाची रेसिपी

★ बटाट्याची रस्सा भाजी करण्याची कृती ★

संपूर्ण व्हिडिओ येथे पहा 👇 👇 

सर्वप्रथम कढई गॅसवर ठेवली. त्यानंतर त्यामध्ये तेल घातले. गरम झाल्यानंतर एकीकडे लसूण, एकीकडे कांदा, एकीकडे मोहरी, जिरे टाकून छान परतून घेतले.

त्यामध्ये कढीपत्ता पुन्हा परतले. त्यामध्ये किंचितशी हळद आणि मिरच्या परतून घ्या. नंतर किसलेलं आलं घालून पुन्हा परतलं. थोडी कोथिंबीर घातली. त्यानंतर एक ते दोन चमचे खोबरं पावडर घालून पुन्हा परतून घ्या.

नंतर त्यामध्ये टोमॅटो घालून तो परतून वाफवून घ्या. टोमॅटो परतून झाला की, त्यामध्ये हळद, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, हिंग घालून परतून घ्या.

मग या मसाल्यामध्ये उकडून घेतलेले बटाटे घालून परतून घ्या, म्हणजे बटाट्याला मसाला छान लागतो.

वाटण न करता बटाट्याची भाजी, बटाट्याची रस्सा भाजी, बटाट्याची भाजी, झणझणीत रस्सा भाजी

बटाटा आता छान परतलेला आहे. आता त्यामध्ये मी एक ग्लास पाणी घाला. रंग सुद्धा किती छान आलेला आहे! आता यावर थोडीशी कोथिंबीर, भूरभूरली चवीनुसार मीठ, चवीनुसार साखर, आणि थोडासा खडा मसाला घाला.

एक छान उकळी आणून घ्या. म्हणजे तयार आहे **वाटण न करता तयार झालेली बटाट्याची रस्सा भाजी**!

Potato vegetable without portioning, potato soup vegetable, potato vegetable, spicy soup vegetable

तुम्ही सुद्धा ही रेसिपी करून पहा. रेसिपी आवडल्यास...

चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा फेसबुक पेजला फॉलो करा
Previous Post Next Post

Contact Form