मिसळ (मटकी शिवाय)
साहित्य:
- २ कांदे
- २ टोमॅटो
- १ बटाटा
- २ लसणाचे गड्डे
- ३-४ टेबलस्पून तेल
- १/२ टीस्पून मोहरी
- १/२ टीस्पून जिरे
- १/२ टीस्पून हळद
- १ चमचा कांदा-लसूण मसाला
- १ चमचा मिसळ मसाला
- हिंग, लिंबाचा रस
- मीठ चवीनुसार
- मोड आलेले शिजवलेले मूग
- कोथिंबीर, फरसाण, शेव सजावटीसाठी
कृती:
- कढईत तेल गरम करून त्यात मोहरी व जिरे घालून तडतडवून घ्या.
- ठेचलेला लसूण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परता.
- चिरलेला बटाटा घालून शिजवा.
- कांदा टाकून मीठ घालून गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परता.
- टोमॅटो घालून छान परता.
- हळद, कांदा लसूण मसाला आणि मिसळ मसाला टाकून परता. थोडं पाणी टाकून शिजवा.
- हिंग व लिंबाचा रस टाकून परता.
- मोड आलेले मूग टाकून छान परता.
- एक ग्लास पाणी टाकून झाकण ठेवून उकळी आणा.
- सर्व्ह करताना प्लेटमध्ये फरसाण, मूगाची भाजी, कोथिंबीर, शेव व कट टाकून मिसळ तयार करा.
सर्व्ह करण्याची टिप: ही मिसळ पाव, भाकरी किंवा भातासोबत खायला अतिशय मस्त लागते.